Wednesday, November 6, 2019

पुणे-वाहतूक निरीक्षण भाग २

भाग 2-
चला आता या आपल्या जागेवर परत... फातिमानगरच्या दिशेने जाताना सिग्नलला परत गर्दी..आता खरी मजा तर इथून पुढेच सुरू होतीये..पेट्रोल पंप समोर सावज टिपून थांबलेलेच असतात तिथं.5-6 गाड्या तर होत्याच आजूबाजूला...हेरून पहारा चालला होता...भेटल्यावर खिसा कापला जाणार हे तर सगळ्यांनाच माहिती आहे।।।त्यामुळं गाडी बाजूने कशी घेता येईल याकडे सगळ्यांच लक्ष लागून होत..कॅम्पच्या परिसरात असताना एका ambulance चा आवाज आला..वाटलं देतील लोक आता त्या गाडीला जागा..कसलं काय तेव्हा..माणुसकी आहे का आता जीवंत... लोकांची घाई काय तर ambulance च्या मागून आपल्याला कस जाता येईल लवकर..निर्लज्ज झालेत लोक अक्षरशः..बाहेरच्या देशांमध्ये ambulance चा नुसता आवाज जरी आला ना तरी सुद्धा 5 मिनिट मध्ये सगळ्या रस्त्यावरच्या गाड्या डाव्या बाजूला होतात.. आपण शर्यत लावतो ambulance समोर..या लोकांना तेव्हा जाणीव होईल जेव्हा त्याच ambulance मध्ये आपल्या परिवारातील कोणतरी असेल...अक्कल तर तेव्हाच येईल..संवेदनशील पणा पूर्णपणे हरवत चाललाय.. देव जाणे अस कधी होऊ नये की ambulance चा पाठलाग करता करता त्याच व्यक्तीचा पाठीमागून ठोकून अपघात होऊ नये आणि तिला त्याच ambulance मध्ये घेऊन जावं लागेल...
         नमुना क्रमांक 2-
         अजून एक नमुने आहेत आमच्या पुण्यात..पायाने गाडी थांबवणारे.. यामध्ये बहुदा १००% महिला आणि मुलीच असतात..कुठल्या ग्रहावरून आलेल्या असतात काही अंदाज नाही.. आमिर खानच्या PK movie मध्ये जशी त्याच्याकडे विचित्र शक्ती असते तशी यांच्या मध्ये असते की काय यावर आता वाद घालण्याशिवाय पर्याय नसावा बहुदा...सगळ्याच महिला, मुली नसतात यामध्ये ...परत म्हणताल की target करतोय हा आम्हाला..रस्तावर गाडी चालवायची अक्कल नसते.indicator, licence, हेल्मेट तर लांबचीच गोष्ट राहिली.. परत काही झालं की खापर दुसऱ्यांवर फोडायचे... असो..
     नमुना क्रमांक 3-
     गाडीवर पुढे हिरो बसलेला असतो आणि मागे हिरोईन... त्यांना काय वाटत काय कळत नाही आपल्याला तर...अशी गाडी पळवतात जसे काय "fast and furious" मध्ये यांनी काम केलेलं आहे..त्यावेळी हेल्मेट तर नसतंच बहुदा..हिरोईन काय बोलती समजायला हवं ना.अस कस..अहो,हेल्मेटने आवाज नाही ना येत..जाउद्यात.. जीव असतो त्यांचा..😂🔥😜अंह काळजाचा तुकडा..
 
नमुना क्रमांक ४-
    अंदाज बांधा जरा..कोण असेल बरं.....!!!!सापडले...
अहो तेच ते..सापासारखी गाडी पळवणारे प्राणी.. कुठून आलेले असतात काय माहिती...तोंडात मावा,केस अस्वलासारखे, छपरी कपडे..मस्त मस्त...त्यांना स्वतःचा खूप अभिमान असतो..त्यात एखादी मुलगी दिसावी..अरेरेरे..मग तर काय सांगायलाच नको..गुडघे जमिनीलाच स्पर्श करतात त्यांचे तर..असल्याना लवकर मुक्ती मिळो..
   
नमुना क्रमांक ५-
      रस्त्यावर मावा,गुटखा खाऊन थुंकणारे मंडळी.
आपल्या बापाची मालमत्ता असल्यासारखं road वर थुंकत असतात..ड्राइवर मंडळी जास्तच असतात यात.. नाही करायला पाहिजेत अशा गोष्टी..देव लवकर सद्बुद्धी देवो यांना.
      टीप:सदरचा लेख हा माझ्या निरीक्षणातून आलेला आहे. वैयक्तिक अपमान करण्याचा यामध्ये अजिबात हेतू नाहीये..हेतू हाच आहे की वाहतुकीचे नियम सगळ्यांनी पाळायला हवेत..जीवन एकदाच आहे..नीट वापर करा..
सुरुवात आपल्या स्वतःपासून करा.इतर लोक सुद्धा सुधारतील..
  आपले लेख असेच चालू राहतील..stay tuned.. काही सूचना असतील तर कळवत जा...
लेख आवडल्यास जरूर कळवा..
धन्यवाद...
संपर्क साधा: vchaudhari592@gmail.com
   

Tuesday, November 5, 2019

पुणे-जीवनप्रवास

भाग १-
शुभ प्रभात पुणेकर...
दुपार झालीये.पण माझ्यासाठी आता सकाळचं म्हणावी लागेल....का म्हणून का विचारताय??अहो,आताशी झोपेतून उठलोय..रात्री जरा कामावरून येण्यासाठी वेळ लागला..वरुणराजा होता ना सोबत म्हणून.. बाकी विशेष अस नव्हतं काहीच..
आवरायचं होत आता..पण म्हणलं जरा गादीवर लोळता लोळता कायतरी करावं..काल पुण्यात गेलो होतो सकाळी..design चे classes बघायला...जाम ट्रॅफिक होत यार..कंटाळा आला अक्षरशः.. आणि त्यात वरून ऊन..हेल्मेट घातलं होत बरका🙈...तस नाही हो परत तुम्हीच म्हणताल की लागला अक्कल शिकवायला...😊अहो,आपण पुणेकर जन्मतःच अक्कल घेऊन आलेलो..फक्त ती कुठं वापरायची यात आपण मागे पडतो...तर झालं असं की-काल सकाळी  उठायला आजच्यासारखंच जरा late झालं..मूड पण चांगला होता. आणि स्वारगेट ला सुद्धा काम होत classes च...ठरला विचार...घेतली गाडी,हेल्मेट...आणि केला प्रवास चालू...निघतानाच कुठं मांजर आडवी आली काय माहिती....एक आजोबा अचानक समोरून आडवे आले गाडीला..नशीब बेहत्तर.. आता त्यांचं की माझं हे तुम्हीच ठरवा.😂गाडी अगदी त्यांच्या पुढ्यात येऊन थांबली..हुश्श...दोघेपण ठीक होतो... परत गाडी चालू केली आणि निघालो...मुख्य रस्त्याला लागलो तर काय...ट्रॅफिक जाम.. तस नाही हो...आपल्याकड ते रोजच असत पण काल जरा जास्तच होत..PMPML ची बस बंद पडली होती(सर्वात जास्त वेळा ट्रॅफिक जाम या गोष्टीमुळेच होत)..असो...गाडीतळ, हडपसर पर्यंतच ट्रॅफिक होत.तिथून पुढे थोडा मोकळा रस्ता होता...मग काय तर निघाली स्वारी..रोजच्या जोमात..घरातून निघतानाच विचार केला होता की पुण्यात तर काय आपण रोजच फिरतोय..आज जरा वेगळ्या चष्म्यातून बघावं..बघू सावज भेटलं तर भेटलं...
        कारणही तसंच होत...घरातून निघायच्या आधीच youtube बघत होतो... वाहतुकीच्या,rash driving व्हिडिओ बघितल्या होत्या... म्हणलं आज आपण पण निरीक्षण करावं जरा...स्वतःच पण आणि दुसऱ्यांच पण..मगरपट्टा उड्डाणपुलावरच पहिला अनुभव आला..उजवीकडे वळताना Indicator द्यायचा असतो..साफ निराशा....अगदी मोजक्याच गाड्यांनी ही शिस्त पाळली होती..पोलीस चौकीसमोर परत एकदा जाम ट्रॅफिक..हॉर्न वाजवून वाजवून चारचाकी वाहनांनी अक्षरशः डोक्याची मंडई केली होती..आता उद्यापासून पुणेकर म्हणून गाडीच्या पाठीमागे लिहितो की-"आम्ही काही रोडवर मुक्काम करणार नाही,त्यामुळं हॉर्न वाजवू नका"..एक पुणेकर म्हणून एवढं चालतच हो..थोडीशी मस्ती...चालू रस्त्यावर हॉर्न वाजवा हो..आक्षेप नाही कसलाच.पण traffic जाम मध्ये सुद्धा हॉर्न.. आता तिथं आपल्याकडं पर्याय पण नसतो...जागेवर उभच राहावं लागतं..हॉर्न वाजवणारे कुठल्या ग्रहावरून येतात काय माहिती..का त्यांच्या गाड्या अंतरिक्ष यान आहेत त्यांनाच माहिती ते आता..ट्रॅफिक jam झालं की उडलेच हवेत..धीर धरत जा हो...त्रास होतो इतर लोकांना त्याचा..लहान मुले,आजी,आजोबा, आजारी व्यक्ती प्रवास करत असतात..
       स्वारी पुढे चालली. वैदवाडीच्या पुलावर रोजच्या प्रमाणे, नित्याने traffic जाम होत..अहो पण त्या ट्रॅफिकला भाव देणार...hatttt... आम्ही पुणेकर आहोत...घातल्या गाड्या BRT मधून...मग काय बसचा पाठलाग सुरू..मी नव्हतो बरं का त्यात..परत गैरसमज नको..पुढच्या चौकात कधी नव्हे ते पोलीसकाका BRT मधून येणाऱ्या गाड्या अडवत उभे होते.. आता तर खरी मजा सुरू होणार होती.. काल माझ्याकडे वेळ पण होता.आणि मूड पण होता..घेतली गाडी बाजूला..बघावं म्हणलं काय होतंय.. settlement😅😐अजिबात नाही...ते नाही बघायचं हो..देवाचं असत ते...असुद्या..😊एकतरगाडी BRT मधून आणून चुकी केली..वरून परत त्या "सदगृहाने" पोलिसांशी वाद घालायला सुरुवात केली.. उशीर झालाय, traffic जाम आहे, इतकं ट्रॅफिक असताना तुम्हाला हे असले धंदे सुचतात काय..मीच दिसलो काय तुम्हाला.बाकीचे पण पकडा की..अहो चोर तो चोर आणि वर शिरजोर.. तसच की चोराच्या उलट्या बोंबा.. पोलिसांना पण ego असतो हो..ते पण काम करतात..पण एखाद उलट बोलल्यावर कोण ऐकून घेणारे तेव्हा..त्यांनी लावला 1200 रु. चा दंड...आता काय..आलीये भोगासी, असावे सादर,..त्या माणसाने गपगुमान गाडी चालू केली आणि गेला निघून..2 मिनिट शांत बसून जर त्यांना विनंती केली असती तर कदाचित सुरक्षित निघून जाता आलं असत..जाऊद्या.... आता बोलून पण फायदा नव्हता.असो...

क्रमशः
   स्वारगेटला अजून पोचलो नाही..अजून पुढे आहे...लेखनप्रपंच चालूच राहील..आज उद्या भाग 2 येईल..लेख आवडला असेल तर comment करा..काही नवीन सुचवा...